‘जय भीम’ : भारतीय समाजामध्ये व्यक्तीच्या आणि समाजसमूहांच्या सामाजिक व न्यायिक प्रतिष्ठेकरता लढले जाणारे विविधांगी विचारांचे लढे अंतिमतः आंबेडकरांच्या विचारमार्गानेच परिपूर्ण होऊ शकतात, हा विधायक मूल्यसंदेश या चित्रपटाने भारतीय समाजापुढे ठेवला आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान, त्यांचे लोकशाहीवादी तत्त्वज्ञान आणि त्यांचे एकंदर विचारभान देशातील सर्व लोकांच्या मुक्तीचा सर्वाधिक कालसुसंगत असा वारसा ठरतो, याचे कलात्मक पातळीवरील आविष्करण हा चित्रपट करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या आजच्या कालखंडात आंबेडकरांचा संविधानिक आणि वैचारिक वारसा हा नित्यनूतन ठरतो, याचे भान हा चित्रपट भारतीय समाजाला गंभीरतापूर्वक देतो.......